2024 Industry
कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वसामान्यांची सेवा करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदत करणे तसेच शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवणे.
बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व उपक्रम राबवणे.
गरीब व वंचित घटकांना आवश्यक मदत व सुविधा पुरवणे.
विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ गाव, तालुका व जिल्हा स्तरावर पोहोचवणे.
गाव, तालुका व जिल्ह्यात सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक व पायाभूत उपक्रम राबवणे.
अपंग व्यक्तींना व्हीलचेअर्स व इतर आवश्यक सुविधा पुरवून त्यांना सक्षम बनवणे.
प्रत्येक गावात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून आरोग्य सेवा व जनजागृती करणे.
गावे, तालुके व जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करणे तसेच पर्यावरण विषयक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
पर्यटन स्थळांवर संरक्षण सेवा, पोलीस मित्र, मार्गदर्शक व बचाव पथके यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे.